
मुंबई : मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा होत आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल, अशी इच्छा पत्नी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे आपलं भाषण करत असतात.त्याबद्दल आम्ही घरी कधी चर्चा करत नाही. त्यांचेच विचार असतात, लोकांच्या समस्यावर ते बोलत असतात. ते कधीच लिहिलेलं भाषण करत नाही, की कुणी चोरून वाचू शकेल, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दली. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावल्याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
