महानगरपालिकेच्या या शाळेत प्रवेशासाठी चक्क पालकांनी रात्र जागून काढली…

कोल्हापूर : एका बाजूला महापालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे दृश्य असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी चक्क पालकांनी शाळेत रात्र झोपून काढल्याचं चित्र आहे.

खासगी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आपण नेहमीच पाहतो, पण महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी होणारी राज्यातील ही पहिलीच शाळा ठरलीये.

पालकांची गर्दी

महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची झालेली गर्दी चर्चेचा विषय ठरलीये. नेहमी खासगी शाळेत दिसणारे दृश्य गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या जरगनगर शाळेत दिसत आहे. यावर्षी तर प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी चक्क रात्र जागून काढलीये. तर काही जण अंथरून घेऊनच शाळेत आले. मात्र तरीही काहींच्या पाल्यांना प्रवेश मिळाले नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली.

🤙 8080365706