मंत्री ज्योतिरादित्य (२३ मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास योजनातंर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य (२३ मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधील गावात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवास योजनेनुसार, ते तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मागील दौऱ्यात त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये विकासकामांचा आढावा घेतला होता.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे उद्या सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शिरोळकडे प्रयाण करतील. त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता हुपरीमध्ये (ता. हातकणंगले) चांदी कारागिरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटमधील कार्यक्रमास हजेरी लावतील. तेथील कार्यक्रम पार पाडल्यानंतर कुरुंदवाडमधील कार्यक्रमास उपस्थिती लावून रात्री कोल्हापुरात आगमन आणि मुक्काम असेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारीने जोतिबाला जाऊन मंदिराला भेट देतील. मंदिर दर्शन झाल्यानंतर पन्हाळा येथील कार्यक्रमास उपस्थितीत राहणार आहेत.

🤙 8080365706