
कोल्हापूर :गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज एका दिवसात ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज अखेर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे. इचलकरंजी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.
आज सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 4 नगरपलिका क्षेत्रातील आहेत तर हातकणंगले व करवीर या 2 तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.चाचणी संख्या वाढवण्याबाबतची सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी यांनी प्रशासनाला दिली आहे.
