
कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फारच वाढ झाली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.पर्यटन क्षेत्रही यातून सुटले नाही. त्यामध्ये हि जेष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी ट्रिप बुकिंग करताना सतर्क असणे फार गरजेचे आहे. असे मत टाक प्रेसिडेंट बळीराम वराडे यांनी व्यक्त केले.
दिवाळी नंतरचा काळ हा पर्यटनासाठी योग्य मानला जातो. देशातील व विदेशातील पर्यटन खूप जोमात चालते.,याचाच फायदा घेऊन काही लोक बोगस ट्रॅव्हल एजन्सी निर्माण करतात. व त्याद्वारे लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्याच्या कडून ट्रिप बुकिंग करतात पण त्यांच्या ट्रिप प्रत्यक्षात होत नाहीत व त्याना पैसे परत मिळत नाहीत. असे फसवणुकीचे प्रकार कोल्हापूरमध्ये अलीकडे वाढलेले आहे. त्यामुळे ट्रिप बुकिंग करताना नागरिकांनी सतर्क राहून आपल्या जवळील लोकांकडूनच किंवा ट्रॅव्हल एजन्सीची पूर्ण माहिती घेऊन तसेच संबंधित ट्रॅव्हल एजन्सी ही टाक ची रजिस्टर कंपनी आहे का याची खात्री करूनच बुकिंग करावे असे आवाहन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर(टाक) चे प्रेसिडेंट बळीराम वराडे यांनी केले.
