ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात जोरदार उसळी…..

दिल्ली : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.

जागतिक पातळीवर झालेल्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये बघायला मिळत आहे.सोन्याचा भाव याआधी बाजार चालू असलेल्या दिवशी ५८ हजार ७०० रुपये होता. आता राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने आतापर्यंतची विक्रमी कामगिरी केली आहे. चांदीच्या दरानेही सोमवारी मोठी उसळी घेत प्रतिकिलो १ हजार ८६० रुपयांची वाढ नोंदविली. त्यामुळे चांदीचा दरही ६९ हजार ३४० रुपयांवर पोहोचला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, की दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमसाठी ६० हजार १०० रुपयांवर गेला. त्यात सुमारे १ हजार ४०० रुपयांची वाढ दिसून आली.

🤙 8080365706