
कोल्हापूर : दीपाली सय्यद यांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही राज्य सरकारची अधिकृत स्पर्धा असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरून आणि नेमकी कोणती खरी? यावरून आता तीन ठिकाणांवरून कुस्ती लागली आहे. त्यामुळे पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राज्य कुस्तीगीर स्पर्धेकडून 23 आणि 24 मार्चला सांगलीमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतीय कुस्ती परिषदेच्या अस्थायी समितीने 1 ते 7 एप्रिल दरम्यान पुण्यात स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. दिपाली सय्यद यांच्या कोल्हापुरात होणारी कुस्ती स्पर्धा ही राज्य सरकारची अधिकृत कुस्ती स्पर्धा असल्याच्या दाव्याने कुस्ती क्षेत्रात वादळ निर्माण झाले आहे.25 एप्रिल रोजी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे कोणाची स्पर्धा अधिकृत यावर आता तोडगा काढण्याची वेळ आली आहे.
