
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, ‘जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील आर्थिक तफावत लक्षात घेवून जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती समन्वय समितीचे विश्वास काटकर यांनी दिलीय. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.राज्यातील अवकाळीमुळे जी कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याचं समन्वय समितीने सांगितलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
