
कोल्हापूर : शांतिनिकेतन शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थिनीला रामदास आठवले प्रतिष्ठान कडून राज्यस्तरीय शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार अत्यंत लहान वयात अनुप्रिया ने मिळविला आहे.पाच विश्वविक्रमाची मानकरी ठरलेली अनुप्रियाने राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 45 हून अधिक पुरस्कर प्राप्त केले आहे.ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेची मानद सदस्य असून कार्यकारणी समितीवरही तिची नेमणूक झालेली आहे. ती अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांची ब्रँड अँबेसिडर असून संविधान व बालहक्क कायदा या विषयासंदर्भात जाणीव जागृतीचे कार्यक्रम हाती घेते. यासोबत अनेक स्पर्धात्मक परीक्षेमधून तिने 50 हून अधिक सुवर्णपदकांची कमाई केलेले आहे या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
