
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता करवीर येथील लेखापरीक्षक बाजीराव महादेव गोदडे वय वर्ष ४६ यांचे गूरुवार दि १६.३.२०२३ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांचेवर यापुर्वीही दोनवेळा हृद्याची अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.तरीही त्यांना धाप लागणे आदी तक्रारी जाणवत होत्या म्हणून त्यांचेवर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि घराचा आधारवडच हरपला. घरची परिस्थिती बेताचीच तरीही सर्वावर मात करत बाजीराव ने B.com,JD&A चे शिक्षण पूर्ण करून सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षण चे काम करत आई ,वडील ,पत्नी आणि दोन मुले सांभाळत आपला संसाराचा गाडा चालवला होता.पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुखाचे दिवस येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
बाजीराव मनमिळाऊ होताच पण लोकांना खळखळून हसवण्याची कला जणु त्यांच्या अंगी अवगत होती.हास्यसम्राट म्हणुन त्यांची ओळखच झाली होती.त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.त्यांच्या अचानक झालेल्या एक्झीटने अनेकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते.त्यांच्या निधनाने सर्व स्थरातुन हळहळ व्यक्त होत आहे …. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दि.१९ रोजी आहे.
