बेमुदत संपाबाबत पुरोगामीच्या शिष्टमंडळाची, समन्वय चे निमंत्रक विश्वास काटकर यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : राज्य सरकारी- निमसरकारी व शिक्षक- शिक्षकेतर संघटनांची समन्वय समिती महाराष्ट्रचे निमंत्रक विश्वास काटकर यांची राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन समन्वय समिती सोबत पुरोगामी शिक्षक संघटना १४ मार्चपासून संपात सक्रीय सहभागी असल्याचे पत्र दिले व संपाबाबत चर्चा केली.

यावेळी बोलताना राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ही २४ जिल्ह्यात कार्यरत असून सर्वच जिल्ह्यात १४ मार्चपासून संपात सक्रीय सहभाग आहे. आणि आपला आदेश येईपर्यंत आम्ही आपल्या सोबतच या लढ्यात सहभागी असल्याची ग्वाहीही पाटील यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत शासनाकडून लवकरच चर्चेसाठी निमंत्रण येण्याची शक्यता असून चर्चेत योग्य तोडगा निघाला नाही तर संपाची तिव्रता वाढविण्यात येणार असल्याचे विश्वास काटकर यांनी शिष्टमंडळास सांगितले. यावेळी मध्यवर्ती संघटनेचे कार्यकारी सचिव अविनाश दौंड व जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्यासह सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते.

संघटनेच्या शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार अविनाश म्हात्रे , रायगड जिल्हा नेते गोविंद पाटील , रायगड जिल्हाध्यक्ष वसंत मोकल, राज्य संघटक पी आर पाटील , खजिनदार सुनील देशमुख, दयानंद मोकल, विकास गायकवाड, दत्तात्रय भोंडकर आदी उपस्थित होते.

🤙 8080365706