
मुंबई: कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात H3N2चे आतापर्यंत एकूण ३५२ रुग्ण आढळले आहेत.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. H3N2 व्हायरस कोरोनासारखाच जीवघेणा ठरणार की काय अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.मुअशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. H3N2 व्हायरस कोरोनासारखाच जीवघेणा ठरणार की काय अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत इन्फल्युएंझा H3N2 आजाराच्या संसर्गाविषयी आढावा घेण्यात आला. इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार असून तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत आणि या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
