दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून ही माऊली देश सेवेसाठी रवाना…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथील वर्षा पाटील या भारतीय सीमासुरक्षा दलात (बीएसएफ) मध्ये जवान आहे. त्या वैद्यकीय सुट्टीवर होत्या. आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून त्या पुन्हा एकदा कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जात होत्या. कोल्हापूरहून नियुक्तीच्या ठिकाणी जातानाचा कुटुंबांना निरोप देत होत्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

कारण त्या आपल्या दहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घरी सोडून जात होत्या. मग बाळाला आणि कुटुंबियांना सोडून जाताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मार्तृत्व आणि कर्तव्याचा मेळ राखत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. अर्थात महिला जवान वर्षा पाटील यांच्या यांचे सोशल मीडियात कौतुक देखील होतंय.

🤙 8080365706