बहूजन समाजातील तरुणांनी व्यवसायातून स्वावलंबी होण्यासाठी “मेक ईन कोल्हापूर “हेच व्यासपिठ; राजे समरजितसिंह घाटगे

कागल- येथे राजे विक्रमसिंह घाटगे बँक आयोजित मेक इन कोल्हापूर संकल्पने अंतर्गत नवउद्योजक तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राज्य समरजितसिंह घाटगे

राजे बँकेमार्फत नवउद्योजक तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा

कागल : बहुजन समाजातील तरुणांनी व्यावसायिक स्पर्धेत उतरून स्वावलंबी व्हावे. यासाठी मेक इन कोल्हापूर संकल्पनेतून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथे राजे विक्रमसिंह घाटगे बँक आयोजित मेक ईन कोल्हापूर अंतर्गत सहभागी यशस्वी उद्योजक व नवउद्योजक तरुणांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडियाच्या धर्तीवर 2021 पासून राजे बँकेच्या माध्यमातून मेक ईन कोल्हापूर संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या मातीतील यशस्वी उद्योजकांच्या अनुभवाचा फायदा तरुणांना होत आहे. नवउद्योजक तरुणांसाठी राजे बँकेच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे कर्ज पुरवठा केला जात आहे. यातून यशस्वी उद्योजक घडवले असून नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे तरुण स्वतःच्या पायावर उभे केले आहेत. यावेळी सलगर चहाच्या भक्ती माळी, दत्त भेळ अँड मोअरचे बाळासो घुणके, लाडाची कुल्फीचे प्रतीक दिंडे, व्हॅलेंटिना आईस्क्रीमचे संदीप सावंत, हिंदुस्तान फूडचे शबाना शेख, अनिज् केक रूमचे अनिकेत भंडारे, हनुमान डोसाचे मनीष नायडू, आबा वडेवालेचे बाबासो घुणके,महाराजा ज्यूसचे इर्शाद बागवान यांनी नवउद्योजक तरुणांसाठी स्लाईड शोद्वारे व्यवसायासाठी मार्गदर्शनपर सादरीकरण व त्यांचे अनुभव सादर केले. यावेळी राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब हूच्चे,उमेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत राजे बॅंकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी केले. आभार संचालक राजेंद्र जाधव यांनी मानले.

*चौकट*

कागलची राजकीय विद्यापीठ ओळख पुसा व उद्योजकांचे कागल अशी नवी ओळख निर्माण करा घाटगे यांनी कागलची राजकीय विद्यापीठ अशी असलेली ओळख ही निश्चितच भुषणावह नाही. तरुणांनी नेत्यांच्या मागे न फिरता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग-व्यवसाय करावेत. अशा तरुणांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. कोल्हापूरच्या मातीत यशस्वी उद्योजक म्हणून नावाजले जात असलेल्या व्यवसायिकांनी अशा तरुणांना मार्गदर्शनपर प्रोत्साहन द्यावे व कागलची ओळख राजकीय विद्यापीठ ऐवजी उद्योजकांचे कागल अशी करण्यासाठी प्रयत्न करुया. अशा व्यक्त केलेल्या अपेक्षेस उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानिशी दाद दिली.

🤙 8080365706