साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कडून प्रांतअधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

दापोली : दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडीने प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे.

त्यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका. ठेवण्यात आला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळखळ उडाली आहे.जयराम देशपांडे हे दापोलीतील प्रांताधिकारी आहेत. ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष बाब म्हणजे अगदी चार दिवसांपूर्वीच उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत तसेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याचं बोललं गेलं. सभा पार पडून आठवडा उलटत नाही तोच संजय कदम यांना ईडीने बेड्या ठोकल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

🤙 8080365706