सोप्या प्रकारचा व्यायाम म्हणजे चालणे

शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी वरदान असते, चालणे हा त्याचाच एक भाग आहे. तसेच चालणे हा अतिशय सोप्या प्रकारचा व्यायाम असून चालण्याचे आरोग्याला होणारे फायदे पाहूयात..

ब्रिस्क वॉकींग केले तर १५० ते २०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे पोटऱ्यांचा भाग, पाय आणि पोटाचा भाग कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर चढावर चालण्याचा जास्त फायदा होतो.

हृदयासाठी फायदेशीर चालणे हा एकप्रकारचा कार्डीओ व्यायाम असल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ते फायदेशीर असते. तसेच गुड कोलेस्टेरॉल वाढावे यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. हायपरटेन्शन कमी होण्यासही याचा चांगला फायदा होतो. डायबिटीस नियंत्रणात राहण्यासही याचा चांगला उपयोग होतो.

चालण्याचा व्यायाम हा केवळ शरीरासाठी फायदेशीर नसतो. तर मानसिक आरोग्यासाठीही चालणे उपयुक्त असते. मेंदूचे कार्य शार्प राहावे, मेमरी फंक्शन चांगले राहावे यासाठी चालणे फायदेशीर असते. 

🤙 8080365706