यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम ; गडहिंग्लज पंचायत समिती द्वितीय

कोल्हापूर: यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या प्रस्तावांच्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद ने विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर गडहिंग्लज पंचायत समितीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प् संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) मा. मनिषा देसाई-शिंदे सर्व जिल्हा परिषद खातेप्रमुख व अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केलेले आहे. यानंतर जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी विभागामधुन निवड झालेने लवकरच राज्य स्तरीय समिती पडताळणीसाठी येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकिय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन , निवृत्ती वेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे इ. सर्व विभागाकडील केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती तसेच जि.प. कडील स्वनिधी इ. प्राप्त निधी व केलेला खर्च, अंगणवाडी कामकाज, लसीकरण, प्रसुती, जननी सुरक्षा योजना, पाणी पुरवठा योजना, बांधकाम कडील पुर्ण – अपुर्ण कामे, घरकुल मंजुरी, हागणदारी मुक्त गावे, मनरेगा कामे, लेखाशिर्षाचे जमा खर्च पत्रके, लेखा परिक्षण, शाळामधील स्वच्छतागृहांची उपलब्धता, शाळा डिजीटल, ग्राप कर वसुली, पाणी पट्टी वसुली, ई ग्रामस्वराज्य, सेवा हमी कायदा अंमलबजावणी, पशु लसीकरण, कामधेनू योजना, दिव्यांग व्यक्ती वित्तीय सहाय्य देणे, श्वाबश्वत विकाय ध्येये मध्ये केलेले कामकाज या सर्व विभागाकडील कामकाजाचे तपासणी करणेत आली. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणी मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

तसेच पंचायत समितीने स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. त्यानुसार विभागीय स्तरावरील निवड समिती मार्फत पंचायत समिती गडहिंग्लजची तपासणी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर पंचायत समिती गडहिंग्लजने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. यासाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी शरद मगर यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने हे यश संपादन केलेल आहे.

🤙 8080365706