जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना उद्या पासून संपात

कोल्हापूर : राज्यस्तरावरील संघटनानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत जुनी पेन्शन लागू करणे बाबत बैठकीत चर्चा केली. मात्र जुनी पेन्शन संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनांनी मंगळवार १४ मार्च पासून बेमुदत संप करणेचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद मधील सर्व संघटना यांनी उद्या संपामध्ये सक्रीय सहभाग घ्यायचा निर्णय आज जिल्हा परिषद मध्ये आयोजित सभेत सर्वानुमते घेतला आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांनी सकाळीं 9 वाजता जिल्हा परिषद सभेस उपस्थीत राहून रॅली द्वारे टॉवून हॉल,कोल्हापूर येथे उपस्थित राहण्या बाबतीत आवाहन करण्यात आले.

पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी यांनी पंचायत समिती येथे सभा घेऊन सर्वांनी मिळून तहसीलदार कार्यालय येथे सर्व शासकीय कर्मचारी सभेस उपस्थित रहावे. आपला संप कोणत्याही भूलथापांना बळी न पडता 100,% यशस्वी करावा. असे आपणास आवाहन करण्यात आले. सदर सभेस जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष सचिन जाधव,सचिव अजित मगदूम, लीपिकवर्गिय संघटना अध्यक्ष निलेश म्हालुगेकर, फिरोजखन फरास, राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर,चतुर्थ श्रेणी अध्यक्ष दगडू परिट, जि प सोसायटी चेअरमन रणजित पाटील, आरोग्य संघटना प्रतिनिधी कुमार कांबळे, एम एम भाट,ग्रामसेवक एल एस इंगळे, अजय शिंदे, सुधाकर कांबळे, अजिंक्य गायकवाड,अनिरुध्द शिंदे, सुनिल कोरवि, शिक्षक संघटनेचे राजाराम वरुटे, रवि पाटील, प्रमोद तोदकर , चेअरमन येडके सर, डी पी पाटील, सरदार जाधव, प्रतिमा पाटील, विद्या पाटील, अलका पाटील इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706