
कागल : कोल्हापूर येथे दि रॉयल कोल्हापूर हॉर्स शो स्पर्धेत आर्यवीर समरजितसिंह घाटगे यांना १४ वर्षाखालील स्पर्धेत ‘ बेस्ट रायडर’ व जम्पिंग स्पर्धेत ‘टॉप स्कोरर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी श्रीमंत याज्ञसेनी महाराणी, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,के.इ.इ.चे अध्यक्ष युवराज मालोजीराजे, श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती, श्रीमंत यशस्वीनीराजे छत्रपती महाराष्ट्र इक्वेटोरिअम असोसिएशनच्या अध्यक्षा निता नेहेलानी, सौ श्रेयादेवी घाटगे,अच्युत कारंडेयांची प्रमुख उपस्थिती होती.
