
पंढरपूर : आळंदी आणि देहू ते पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा ‘हरित भक्ती मार्ग’ करण्यात येणार असून, या मार्गावर सभागृह, पेट्रोलपंप आणि फूड मॉल विकसित केले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

या रस्त्यांची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी करण्यात आली.गडकरी म्हणाले, ‘आळंदी आणि देहू ते पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा ‘पालखी रस्ता हरित भक्ती मार्ग’ करण्यात येणार आहे. या मार्गावर पालखी विसाव्याच्या ठिकाणी किमान दहा हजार लोकांच्या सोयीचे सभागृह उभारण्यात येणार आहे.
एरवी लग्नकार्यासाठी आणि वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. पालखी मार्गावर पेट्रोल पंप, फूड मॉल विकसित करण्यात येणार आहे.
