जुनी पेन्शन साठी सांगलीत आज मोर्चा…..

सांगली : राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सांगलीत आज मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात 225 विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे या मोर्चाचे निमंत्रक होते. मोर्चा सकाळी 10 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकातून सुरू झाला. जिल्हा परिषद, राममंदिर चौक, काँग्रेस भवन, स्टेशन चौक येथे सभेने मोर्चाचा शेवट झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाने नवी पेन्शन योजना लागू केली. 2003 मध्ये तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने हा जगण्याचा आधारच काढून घेऊन अन्याय केला आहे. ही योजना केवळ दरमहा तीन ते पाच हजार पेन्शन देणारी आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जगण्याची शाश्वतीच शासनाने काढून घेतली. गेली 17 वर्षे कर्मचारी संघर्ष करीत आहेत.

🤙 8080365706