आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना पदावरून हटवले. नाईकांना हटवल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.नव्या नियुक्तिमध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय रंगली होती. यामुळे त्यांना पदावरून हटवल्याचे बोलेले जाते. मात्र आपल्याकडे पक्षवाढीसाठी जबाबदारी दिल्याने, जिल्हाप्रमुख पद काढून घेतले आहे, असे स्पष्टीकरण नाईक यांनी माध्यमांना दिली आहे.

🤙 8080365706