
कोल्हापूर : कु. सुहानी सचिन ढनाल, रा. कळंबा, कोल्हापूर हिने यापूर्वी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत ५९ किलोवरील वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे सहसचिव सचिन ढणाल यांची कन्या आहे.

महाराष्ट्र राज्य संघात राष्ट्रीय स्पर्धे साठी सुहानी हिची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा बालयोगी इंडोर स्टेडियम तेलंगणा येथे दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी पार पडल्या. राष्ट्रीय स्पर्धेत तिने तेलंगणा हरियाणा या खेळाडूंचा पराभव करून सेमी फायनल फेरी गाठली. तिथे तिचा दिल्ली सोबत सामना झाला आणि कांस्य पदकावर शिक्का मोर्तब केला. ती ऑस्टिन तायक्वांदो अकॅडेमी ची खेळाडू असून तिला प्रशिक्षक शैलेश दास सर यांचे मार्गदर्शन आणि तिच्या आई वडिलांचे प्रोत्साहन लाभले. ती कोल्हापूर हायस्कूल ची विद्यार्थिनी असून ८ वी मध्ये शिकत आहे.
