भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेमार्फत जिल्हा रुग्णालयांमध्ये आंदोलन

कोल्हापूर :भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेमार्फत कोल्हापूर जिल्हयाचे ग्रामीण सेवा रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्षित केले अशोभनीय असे काम. सरकारी जबाबदारी असताना कर्मचारी कामचुकारपणा करतात रुग्णालयात बायोमेट्रिक मशीन असताना सकाळी वेळेत सेवा सुरू होत नाही काही एम. डी डॉक्टर कामचुकार आहेत गोर गरीब नागरिकांना वेटिला धरले जाते त्यांना पेशंट ची खरी ट्रीटमेंट दिली जात नाही रक्त चाचण्या मोफत असताना पेशंट ला बाहेर खाजगी लॅब कडे पाठविले जाते गोर गरीबांचे तपासणी मशीन बंध आहे असे मुद्दाम सांगितले जाते तसेच कोणतेही औषध नाही असे सांगून सीपीआर मधीलच खाजगी मेडिकलमध्ये पेशंट कडून चिट्ट्या दिल्या जातात. सी. पी. आर. मधील गेली तीस वर्षे असाच सुरू आसेल तर दवाखाना केंद्र सरकारच्या ताब्यात द्यावा लागेल असे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे उत्तम पोवार यांनी निवेदनात सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्हा रुग्णालयाचे शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अधिव्याख्याता यांना निवेदन देण्यात आले संस्थापक अध्यक्ष उत्तम पोवार सुनिता कांभरे, तमन्ना शेख, रत्नमाला कांबळे, कृष्णात जाधव, राजेंद्र चौगुले, लखन पाटील प्रशांत माने सुखदेव शेटे विजय लाड नेताजी कांबळे अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706