नसा कमकुवत होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटील मार्गाने बनलेले आहे. यातूनच विविध अवयवांना रक्तपुरवठा होतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे रक्तवाहिन्याही निरोगी ठेवणं गरजेचं आहे.यासाठी अशी घ्या काळजी.

नसांमधील कमकुवतपणा भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन सीचे सेवन करा. यासाठी फ्लॉवर, कोबी, स्ट्रॉबेरी, अननस, पालेभाज्या, संत्री, भोपळी मिरची इत्यादींचे रोज सेवन करा.

फायबर केवळ पचनासाठीच नाही तर, मज्जातंतूंमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते. यासाठी ओटमील, ब्राऊन राईस, हिरव्या पालेभाज्या, फ्लॉवर, एवोकॅडो, चियासीड्स, मसूर इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.कमकुवत नसांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व्हिटॅमिन ईचे सेवन करा. ज्यात काजू, बियाणे, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, भोपळा, आंबा, या पदार्थांचे सेवन करा. यात व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात आढळते.रुटीन फूडमध्ये भरपूर प्रमाणात फ्लेव्हॅनॉइड्स असतात. बेरी, तृणधान्य, सफरचंदाची साल, शतावरी, ग्रीन टी, लिंबूवर्गीय फळ इत्यादींमध्ये भरपूर फ्लेव्होनॉइड्स आढळतात.

🤙 8080365706