
कागल : कागल शहरातील पाझर तलाव येथे लेसर शो व सर्वे नंबर 534 व 532 या जागेत हिलींग गार्डन साठी 4.90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शह ग्रुपचे अध्यक्ष, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला आहे.

या विकासकामांमुळे कागल शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तर पाझर तलावातील लेसर शोमुळे पर्यटकांना भुरळ पडून नगरपालिकेचे उत्पन्नही वाढणार आहे.
पाझर तलाव मध्ये 2.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर हीलिंग गार्डन साठी 2.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कागल शहराच्या विकासामध्ये या दोन्ही विकासकामांमुळे भर पडणार आहे. कागल शहरात सध्या ऐतिहासिक गैबी दर्गा व दिल्लीच्या अक्षरधामच्या धरतीवरील भव्य दिव्य श्री राम मंदिर आकर्षण ठरत आहेत.त्यामध्ये या दोन पर्यटनस्थळांची वाढ होणार आहे.
