कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून सोपे उपाय

कांद्यामध्ये असलेले अमिनो अॅसिड म्हणजेच सल्फोऑक्साइड या रासायनिक घटकामुळे आपल्याला कांदा कापताना हा सगळा त्रास होतो. पण कांद्याला पर्याय नसल्याने आपल्याला तो कापण्याचे काम करावेच लागते. काहींना याचा कमी त्रास होतो तर काहींना जास्त. यासाठी सोप्या टिप्स.

कांदा कापताना आपण त्याची सालं काढतो, त्याप्रमाणे सालं काढून घ्यायची. त्यानंतर कांद्याचे पुढचे आणि मागचे देठ कापून घ्यायचे. मग मध्यभागी कापून कांद्याचे २ भाग करायचे. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कांद्याच्या कापलेल्या या २ फोडी घालायच्या.

कांदा पाण्यात घातल्याने त्यातील रासायनिक घटक निघून जाण्यास मदत होते. ५ मिनीटांनी या फोडी बाहेर काढून त्यातील पाणी निथळून मग कांदा चिरायचा. यामुळे डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही.

दुसरी ट्रिकही अतिशय सोपी आहे. कांदा कापताना तोंडात एखादे च्युइंगम ठेवायचे. हे च्युइंगम चघळत चघळत कांदा कापल्यास डोळ्यातून पाणी येत नाही. बाजारात विविध प्रकारची बरीच च्युइंगम मिळतात. यातले तुम्हाला आवडेल ते कोणतेही च्युईंगम तुम्ही तोंडात ठेवून चघळू शकता.   

🤙 8080365706