
कोल्हापूर : ‘दुर्गाप्रेरणा फिल्म प्रोडक्शन’ निर्मित व संदीप शामराव पाटील दिग्दर्शित ‘लढा पंचायतीचा’ हा मराठी चित्रपट 10 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.अशी माहिती चित्रपटाच्या प्रमुख कलाकार पद्मजा खटावकर यांनी दिली.
यावेळी पद्मजा खटावकर म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्राम स्तरावर सर्वांचा जीवन मरणाशी जो संघर्ष पाहायला मिळाला त्यात सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या संघर्षाचा ,त्यादरम्यान त्यांची झालेली कुचंबना, हालअपेष्टा आहे. तसेच काही वात्रट लोकांमुळे झालेली तारांबळ, विनोद यांचे वास्तव दर्शवणारा आणि मनोरंजन घडवणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी या परिषदेत मुख्य कलाकार पद्मजा खटावकर, देवानंद खटावकर, शशिकांत पाटील,एन.डी चौगुले आदी उपस्थित होते.
