पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली मेक इन कोल्हापूर योजना

कागल :युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ते स्वावलंबी बनावेत. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली व राजे बँकेच्या सहकार्याने ‘ *मेक इन कोल्हापूर’* ही योजना राबविली जात आहे.

या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी इच्छुक असलेल्या तरुणांच्या मार्गदर्शनासाठी सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता कारखाना प्रधान कार्यालय कागल येथे मार्गदर्शन कार्यशाळा घेणार आहोत अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राजे बँकेमार्फत सुरू असलेल्या ‘मेक इन कोल्हापूर’ योजनेअंतर्गत सामाविष्ट असलेल्या व्यवसाय धारकांची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. या कार्यशाळेस दत्त भेळचे बाबासो घुणके, लाडाची कुल्फीचे प्रतिक दिंडे, व्हॅलेंटाईन आईस्क्रीमचे संदीप सावंत, सलगर चहाचे दादू सलगर, हिंदुस्थान बेकरीचे शबान शेख, यांच्यासह इतर उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ नवव्यवसायिक धारकांना होणार आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी बहुजन समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे केले. हाच वारसा मेक इन कोल्हापूर संकल्पनेतून आम्ही पुढे चालवित आहोत. याचा नवउद्योजक युवकांना लाभ होत आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या मातीत यशस्वी झालेल्या उद्योजकांचे अनुभव,राजे बँक व शाहू ग्रुपचे प्रशिक्षण व सर्वतोपरी मदत याचा चांगला फायदा होत आहे व पुढेही होणार आहे. बहुजन समाजात आणखी युवक यशस्वी उद्योजक घडावेत व स्वतःच्या पायावर उभे रहावेत.यासाठी युवकांनी आमच्याकडे येण्याची गरज नाही ,आमचे सामाजिक कर्तव्य म्हणून आम्हीच त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती व आत्मविश्वास निर्माण करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणार आहोत.

🤙 8080365706