कागल नगरपरिषद जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कागल : कागल नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने कागल शहरातील बचतगटाचे खाद्य पदार्थांचे स्टॉल विविध वस्तूंचे प्रदर्शन, महिलांन साठी आरोग्य शिबीर, महिला सबलीकरणा वर राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थिनी कु.आलिशा मोहिते या विद्यार्थ्यांनी चे व्याख्यान आयोजित करणेत आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे अध्यक्षतेखाली समाजातील विविध घटकातील कर्तृत्ववान स्त्रियांचा ही सन्मान करणेत आला. कागल शहरातील बसस्थानक निरीक्षक रुपाली ढेरे महिला अधिकारी म्हणून काम पहातात अशा महिलांचा सत्कार करणेत आला. कोव्हिडं मध्ये पतीचे निधन झाले नंतर स्वतः मुलांचे शिक्षण आणि व्यवसाय जिद्दीने चालवीत असलेल्या डॉक्टर दीपाली सावंत, तसेच महिला हॉटेल व्यावसायिक श्रीमती प्रतीक्षा कुलकर्णी , महिला सफाई कर्मचारी इत्यादींचा विशेष सत्कार करणेत आला.

तसेच विविध खेळा मध्ये पर राज्यात प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार ,ग्रामीण रुग्णालय कागल यांचे कडील नर्सेस यांचा सत्कार करणेत आला विशेष म्हणजे कागल शहरातील 40 बचत गटांचे स्टॉल विनामूल्य नोंदणी करून व्यवसाय करीता मांडण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार रुपाली सुर्यवंशी- बरगे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके नायब तहसीलदार डॉक्टर अर्चना कुलकर्णी , भूमी अभिलेख उपअधीक्षक सुवर्णा पाटील वनक्षेत्रपाल अधिकारी सोनल केसरकर, इ.महिला अधीकारी तसेच मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीराम पवार यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये कागल शहरातील सर्व बचतगटांचे महिला सदस्य कागल शहरातील महिला वर्ग पत्रकार नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा माने यांनी केले तरी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी जागतिक महिला दिना निमित्त सर्व महिलांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रशासन अधिकारी स्नेहल नरके यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्या पाटील यांनी केले .

🤙 8080365706