
साळवन: श्री सिद्धिविनायक मल्टीपर्पज हॉल सांगली येथे भरवण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शोतोकोन कराटे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांचे वतीने संपन्न झाल्या .

लिटल बाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले .या स्पर्धेसाठी राज्यभरातून साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .यामध्ये अनिता गुजर ,विनायक टल्लूर,अरस्लान जमादार यांनी पदक प्राप्त केली . तसेच पदक प्राप्त विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे . या विद्यार्थ्यांना कराटे शिक्षिका सुषमा पिसाळ, सौ .मुख्याध्यापिका शिवानी सूर्यवंशी मॅडम उप मुख्याध्यापिका रिचा सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
