
दिल्ली : संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या भागीदारीत भारताकडून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गव्हाची मदत जाहीर केली आहे.

अफगाणिस्तानवर भारत मध्य आशिया संयुक्त कार्य गटाच्या पहिल्या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे ही मदत काबूलला पाकिस्तानच्या माध्यमातून नाही तर इराणच्या चाबहार बंदरातून दिली जाणार आहे.भारत आणि पाच मध्य आशियाई देशांनी मंगळवारी दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या प्रादेशिक धोक्यांचा एकत्रितपणे सामना करण्यासंदर्भात चर्चा केली.
