अश्विन शिंदे यांना खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्यपदक

कोल्हापूर : सांगली येथील महाराष्ट्र रायफल शुटींग क्लब, शांतीनिकेतन संस्थेच्या वतीने ५ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या रायफल शुटींग स्पर्धेत १२ बोअर”स्किट अँड ट्रॅप” या प्रकारात कोल्हापूरने बाजी मारली.

कोल्हापूरच्या अश्विन बाळासो शिंदे यांना द्वितीय क्रमांक मिळाला. ही स्पर्धा राजू वडार, गौतम पाटील, रुपविकास घाग यांनी आयोजित केली होती. यावेळी अश्विन शिंदे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रौप्यपदक, ट्रॉफी,रोख रक्कम व विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री कै. डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १२ बोअर”स्किट अँड ट्रॅप” प्रकारात कोल्हापूरचे वर्चस्व कायम राखत पुन्हा एकदा अश्विन शिंदे यांनी बाजी मारली आहे.सध्या ते नेमबाजीचे प्रशिक्षण युवराज साळोखे सर आणि अजित पाटील सर यांच्याकडून घेत आहेत. त्यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मेन अँड वूमेन असोसिएशनचे मार्गदर्शन लाभले. अश्विन शिंदे हे कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब/रगेडियनचे आणि ए.बी. एंडोरन्सचे सदस्य आहेत.

🤙 8080365706