कोल्हापूर बाजारपेठेत नैसर्गिक रंगाची वाढती मागणी

कोल्हापूर : होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील बाजारपेठ रंग आणि पिचकारीने सजले आहेत. धुलीवंदनानिमित्त बाजारात पिचकारी आणि नैसर्गिक रंगांना मोठी मागणी आहे. बाजारपेठा विविध आकाराच्या पिचकारी आणि नैसर्गिक रंगाने सजल्या आहेत.

कोल्हापूर भागातील बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकार्‍यांच्या खरेदीला ग्राहक व लहान मुलांची गर्दी होत आहे. कमी दरात वस्तू मिळत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारात स्वदेशी बनावटी साहित्य उपलब्ध असून मागील वर्षापेक्षा यावेळी दर १५ ते २० टक्के कमी असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. बाजारात विविध प्रकारचे रंग असले तरी नैसर्गिक रंगाला मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे.

नैसर्गिक रंग १ रुपयापासून ते ५००रुपये पर्यंत उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या पिचकारी उपलब्ध असून यामध्ये कार्टून्सच्या पिचकारींचे आकर्षण लहान मुलांमध्ये असते. लहान मुलांसाठी बंदूक व पब्जी या खेळांच्या पिचकारी उपलब्ध आहेत. यावेळी पर्यावरण रक्षणाचा विचार करून कोरडी होळी खेळण्यावर भर दिला जात आहे.

🤙 8080365706