अपघात झालेल्या व्यक्तीचा फोटो काढताना दुसऱ्या व्यक्तीचा जीव गेला….

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील हर्सूल रोडवर एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अपघात झालेल्या व्यक्तीचा फोटो काढताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

फोटो काढत असताना या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब अंबादास कळूशे (रा. जाधववाडी) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.जगदीश सांगळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाला हर्सूल रोडवर अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच बाबासाहेब कळूशे हे त्यांच्या दुचाकीने घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि ते दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अपघातग्रस्त सांगळे यांच्याकडे गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मोबाईलमधून अपघातग्रस्त सांगळे यांचा फोटो काढण्यास सुरुवात केली.

🤙 8080365706