
कागल : येथील नगरसेविका सौ. विजया विठ्ठल निबाळकर यांची डोंगरी विकास अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाली.

शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.या निवडीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या निवडीचे पत्र त्यांना दिले. सौ. निंबाळकर या शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थक असून त्यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.सौ.निंबाळकर यांनी कागल नगरपालिकेच्या नगरसेविकापदाच्या कारकिर्दीत धडाडीने काम केले आहे.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यामध्येही आघाडीवर असतात. त्यांच्या या कार्याची पोचपावती या निवडीच्या निमित्ताने मिळाली आहे.
