
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील पळसंबे चाफेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा सागर वरंडेकरला राज्यसेवा परीक्षेत NT-B प्रवर्गातून राज्यात तिसरा येण्याचा मान मिळाला आहे. यामुळे गगनबावडा तालुक्याला अधिकारी होण्याचा पहिल्यांदाच मिळाला आहे. यामुळे तालुक्यातील अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

गगनबावडा तालुका तसा ग्रामीण व मागास समजला जातो. परंतु तो ठसा पुसण्याचा प्रयत्न सागरने केला आहे . सागर वरंडेकर यांचे वडील सुरेश धोंडू वरंडेकर यांनी मुलग्याला शिकवण्याची परिस्थिती नसतानाही शेती व मोल मजुरी करून जनावरे सांभाळून शिक्षण पूर्ण करण्याचा जणू ध्यासच घेतला तर सागर वरंडेकरच्या लहान भावाने स्वतः हॉटेलमध्ये काम करून मोठ्या भावाला क्लास वन करण्याची धडपड सर्वांना दिसून आली .याचवेळी सागरच्या गुरुस्थानी असणारे त्याचे मार्गदर्शक रिजनल कमिशनर PF ठाणे मा. श्री .सुनील चिवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . सागरचे शिक्षण पहिली ते चौथी प्राथमिक शाळा पळसंबे येथे झाले तर पाचवी ते सातवी जिल्हा परिषद आश्रम शाळा पळसंबे येथे पूर्ण केले .व पदवी महादेव हरी शिंदे महाविद्यालय तिसंगी तेथे पूर्ण झाले. तिथून पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली. खडतर यशा नंतर आज राज्यसेवा परीक्षेत NT-B प्रवर्गातून राज्यात तिसरा आल्यामुळे गटविकास अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी पदावर काम करण्याची संधी मिळू शकते . या प्रवासात माझे आई-वडील तसेच सर्वात महत्त्वाची व्यक्ती माझा लहान भाऊ सुशील याची मला खंबीर साथ व पाठबळ होते .तसेच माझे इतर मित्रमंडळी यांचीही सोबत होती. आता माझी प्रशासनात निवड झाली आहे तिथे जाऊन मी ते कसे लोकाभिमुख कार्य करता येईल यासाठी मी प्रयत्न करीन असे मनोगत मा.श्री. सागर वरंडेकर यांनी केले.
