
कागल :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा कर्ज पुरवठा केल्याबद्दल राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या खर्च व त्याची वसुलीच्या आढाव्या संदर्भात बैठक झाली. यावेळी हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील व्हाइस चेअरमन नंदकुमार माळकर संचालक राजेंद्र जाधव आप्पासो आप्पासाहेब भोसले उमेश सावंत आदींनी हे सन्मान चिन्ह स्वीकारले. मराठा समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीराजे बँकेकडून 2018 सालापासून ही योजना सुरु अहे.
एक हजारहून अधिक तरुणांना आज अखेर या योजनेतून उद्योग व्यवसायासाठी 86 कोटी 16 लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आले आहे. बँकेच्या एकूण 265 कोटी रुपये कर्ज वाटपाच्या प्रमाणात या कर्जाची टक्केवारी 32 टक्के तर 450 कोटी रुपये ठेवींच्या तुलनेत19 टक्के इतकी आहे .त्यामुळे राजे बँक कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे या कर्जाची वसुली शंभर टक्के तर थकबाकी शून्य टक्के आहे.
मराठा समाजातील अनेक तरुण नोकरी ऐवजी उद्योग व्यवसाय करून स्वतःचे पायावर उभे राहिले आहेत. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील तरुणांना या योजनेचा लाभ व्हावा. त्यासाठीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
