भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतेवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एम एस देशमुख तसेच श्री एल व्ही चव्हाण व इतर

कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूर वार्षिक क्रीडा स्पर्धा 2022 23 उत्साहात संपन्न झाली.

या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. देशमुख यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी एम. एस. देशमुख आपले मनोगत व्यक्त करीत असताना म्हणाले की भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूर हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासाच्या बाबतीत कटिबद्ध असून याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या सांघिक भावना निर्माण व्हावी तसेच संघामधून खेळत असताना सर्व बरोबर एकत्रित रित्या आव्हानांना सामोर जाण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी या दृष्टीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केली जाते.

या क्रीडा स्पर्धेत खो-खो कबड्डी क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल कॅरम अशा विविध स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये द्वितीय वर्ष सिविल या विभागांनी जनरल चॅम्पियनशिप किताब पटकाविला या स्पर्धा पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख एल.व्ही. चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी ए. बी. महाडिक ए. पी. इंगळे कदम एस. जे. यांनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. एच.एम. कदम मानसंचालक भारती विद्यापीठ विभागीय कार्यालय सांगली प्राचार्य एम. एस. देशमुख सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

🤙 8080365706