सेन्सेक्स आणि निफ्टीची आज उसळी…..

दिल्ली : जागतिक स्तरावरून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज शुक्रवारी उसळी घेतली.

कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स एक हजार अंकांनी वाढला. तर निफ्टी १७,६०० च्या वर गेला. त्यानंतर सेन्सेक्स ८९९ अंकांनी वाढून ५९,८०८ वर बंद झाला. तर निफ्टी २७२ अंकांनी वाढून १७,५९४ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली. PSU बँका आणि अदानी स्टॉक्सनी उसळी घेतल्याने सर्व क्षेत्रांत चौफेर खरेदी दिसून आली. या शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ४ लाख कोटींचा फायदा झाला.सेन्सेक्सवर एसबीआय, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स होते. ते १.५ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. एनटीपीसी, आयटीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि एचसीएल टेक हे शेअर्सदेखील वाढले. सन फार्मा आणि एशियन पेंट्स हे घसरले. निफ्टी मेटल १.७० टक्क्याने वधारला. निफ्टी आयटी आणि निफ्टी FMCG हे देखील वाढले. निफ्टी मेटल सुमारे ३ टक्क्यांने वाढला.

🤙 8080365706