संजीवनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

पन्हाळा : येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी पुस्तकांचे वाचन करताना विद्यार्थी सोबत इतर मान्यवर.

पन्हाळा : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ग्रंथालय विभागात ज्येष्ठ कवी वी. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात करण्यात आला.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वी. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे व वाचनाचे महत्व काय आहे हे यावेळी ग्रंथपाल सौ. व्ही. एन. भोसले यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, एक चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. त्यामुळे मुलांनी पुस्तके त्याचप्रमाणे इतर साहित्य देखील शक्य आहे तितके वाचावे. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागातर्फे करण्यात आले होते.

कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, विभागप्रमुख प्रा. राहुल नेजकर, डॉ. विनायक देवकर, प्रा. एकनाथ साळोखे, प्रा. सरदार देशमुख, क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत इंगवले, डॉ. गजानन कोळी, सहाय्यक ग्रंथपाल संग्राम पाटील, अभिजित लंबे, उमेश तोडकर, उपस्थित होते. संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले.

🤙 8080365706