अज्ञात माथेफिरुने कापली केळीच्या बागेतील ४०० ते ५०० केळीची झाडे….

नंदुरबार : शहादा तालुक्यात अज्ञात व्यक्तींकडून पिके कापून फेकण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी शिवारात उद्धव पाटील या शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत ४०० ते ५०० केळीची झाडे अज्ञात माथेफिरुने कापून फेकल्याने चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. त्याचबरोबर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची तक्रार तिथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.वारंवार घटना घडत असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्येनंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पपई या पिकांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती शेतकऱ्यांच्या शेतातील केळी आणि पपईच्या बागांचे नुकसान करत असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उद्धव पाटील यांच्या शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील ४०० ते ५०० झाडांची कत्तल अज्ञात व्यक्तीने केल्याने त्यांना मोठा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

🤙 8080365706