ओडिशात सापडले सोन्याचे साठे….

देवगड : ओडिशातील देवगड, केओंझार आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओडिशाच्या खाण मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाचे भूविज्ञान संचालनालय याबाबत सर्वेक्षण करत होते.जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा खजिना मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक जॅकपॉट मिळाला आहे. ओडिशातील ३ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाच्या भूगर्भशास्त्र संचालनालयाने देवगड, केओंझार आणि मयूरभंजमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत दिले आहेत.

🤙 8080365706