
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून आम्ही निकर्ष आणि नियम डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारपूर्णपणे पाठीशी उभं आहे. आता नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू झाली नसेल ती सुरू केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना दिलं आहे.
