मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना आली चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सध्या सुरु आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अंबेजोगाई इथे अशीच एक घटना आहे. बारावीचा कॅम्पुटर टेक्निक विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका आली आणि एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा कॅम्पुटर टेक्निक नावाचा पेपर होता. यानुसार विद्यार्थी सेंटरवर परीक्षा द्यायलाही आलेत.मात्र प्रश्नपत्रिका हातात येताच सर्वच विद्यार्थ्यांना धक्का बसला. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका आली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांना याबद्दल सांगितलं. मात्र यामुळे स्टेट बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

🤙 8080365706