
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली जात आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात खलबत झालीअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते. याच आरोपांवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी ठाकरे गटातील आमदारांमध्ये बैठकीत चर्चा झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले. विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबाळ जास्त असल्याने आता ठाकरेंच्या या खेळीने शिंदे अडचणीत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
