
पन्हाळा: पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील स्वर्गीय आम.संजयसिंह गायकवाड पत संस्थेत धाडसी चोरी झाली आहे. ४ लाख ५९ हजार ७९५ रोख रक्कमेसह (१६) तोळे सोन्याचे दागिने मिळून अंदाजित चौदा लाख रुपयांची चोरी झाली असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली. या जबरी चोरीची फिर्याद पत संस्थेचे मॅनजर उत्तम कृष्णात चौगले यांनी अज्ञात चोरट्या विरोध पन्हाळा पोलिसात दाखल केली आहे.

इमारती च्या खिडकीचे गज वाकवून सीसीटीव्ही सेटअप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आहे.खातेदारांनी गहाण ठेवलेले लॉकर मधील सोन्याचे दागिने लॉकर तोडून अंदाजित १६ तोळ्यांचे दागिने पोवार केला आहे. या चोरी मध्ये रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने सुवर्ण अलनकारांचा समावेश आहे.
या धाडसी चोरीची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तर पोलीस वरिष्ठ आधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई मॅडम यांनी भेट देऊन पाहणी केली. भेटी दरम्यान विशेष पाथकाने श्वानच्या सहाय्याने चोरट्याचा माग काढून तपास केला आहे.तसेच फिंगर प्रिंट्स घेऊन लँब ला तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत.
