नरके यांच्या विजयाची चिंता संजय पवार यांनी करू नये: संजय पाटील

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी झाल्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक हिंदुत्ववाद्याला मतदान करणार की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार याचे उत्तर प्रथम शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी द्यावे अशी विचारना कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील खुपिरेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. आमदार चंद्रदीप नरके हे कट्टर शिवसैनिक असून ते शिवसेनेतच आहेत. त्यांच्या विजयाची चिंता पवार यांनी करू नये अशी विचारनाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोल्हापूर येथे शनिवारी शिवसेना ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात चंद्रदीप नरके यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. नरके हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर ते दोन वेळा आमदार झाले .सध्या ते आमदार खासदार नसून त्यांचा शिवसेनेतून फुटून जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना गद्दार म्हणणाऱ्यांनी प्रथम स्वतः आत्मपरीक्षण करावे .चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना जिल्हापरिषद ,पंचायत समिती, बाजार समिती व अनेक ग्रामपंचायतीमध्ये संधी देऊन भगवा फडकवला आहे. शिवसैनिकासाठी एवढे काम करणाऱ्या नरके यांचा निषेध करण्याची गरज नव्हती. नरके यांनी शिवसेना सोडलेली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेस उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. यांना शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे.

यावेळी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेलाच मतदान करणार आहेत .त्यामुळे संजय पवार यांनी नरके यांच्या विजय पराजयाची काळजी करू नये असेही संजय पाटील म्हणाले .या पत्रकार परिषदेस कुंभीचे संचालक अनिल पाटील, पी. डी. पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सरदार मिसाळ, इंद्रजीत पाटील वडणगे, पांडुरंग खटकी आदी उपस्थित होते.

🤙 8080365706