
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष आज आपले मनोधैर्य उंचाविणारा दिवस आहे. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्रबल उत्तम आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल.
वृषभ कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील.
मिथुन कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
कर्क कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल.
सिंह नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा.आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.
तूळ आज रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस काहीसा परीक्षा घेणारा आहे. प्रतिकूलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल.
वृश्चिक प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहारचातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल.
धनु आज मध्यम स्वरूपाचे दिनमान राहील. वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे.
मकर नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल.
कुंभ वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील.
मीन कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा.
