राज्यातील नवीन सरकारच्या स्थापनेवरून बावनकुळे यांचा घानाघात…

पुणे : राज्यात नवीन सरकार येण्यामागे येण्यामागे अदृष्य हात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मात्र ते हात कोणते याचा उलगडा त्यांनी केला नाही. मात्र बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.तसेच अजित पवार राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. तसेच येत्या ८ महिन्यात उद्धव ठाकरेंकडे ४ आमदार राहतील असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.पहाटेच्या शपथविधीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असं कधीही वाटू शकत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री नको अशीच भूमिका शरद पवारांची राहिली आहे. देवेंद्रजींचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला. आधी १२४ नंतर १०५ आमदार देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडून आहे. मात्र राष्ट्रवादीला ७० आमदार देखील निवडून आणता आले नाही.

🤙 8080365706